अहमदनगर बातम्या

राहुरी खूर्द परिसरात बिबट्या जेरबंद

Ahmednagar News : राहुरी खुर्द परिसरात महापारेषणच्या सबस्टेशनमागे महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या शेतामध्ये काल दुपारी एक वाजेच्या सुमारास जखमी आवस्थेत बिबट्या आढळून आला.

त्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.

कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना माहिती दिली व सुरक्षा अधिकारी गोरक्षणाथ शेटे यांनी वनविभागाला खबर दिली व वनविभागाचे कर्मचाऱ्यांच्या दिवसभराच्या भराच्या अथक परीस्रमानंतर संध्याकाळी ६ वाजता या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले.

दरम्यान ३ जन जखमी झाले असून २ वनविभागाचे कर्मचारी असून एक खाजगी व्यक्ती आहे. पैकी दोघांच्या हाताला तर एकाच्या पायाला बिबट्याने चावा घेऊन जखमी केले आहे.

त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्नालयात प्रथमोपचार घेऊन पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुघ्नालयात पाठविण्यात आले. संतोष माधव पारधी (वय ३८ वर्ष रा. संगमनेर), ताराचंद गायकवाड (वय ३० वर्ष रा. राहुरी) व वैभव प्रभाकर जाधव (वय २४ वर्ष, रा. डिग्रस) अशी जखमींची नावे आहेत.

उपवन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहाय्यक वन सरंक्षक गणेश मिसाळ, वन क्षेत्रपाल युवराज पाचरणे, रेस्क्यू टिम संगमनेरचे संतोष पारदे, सतिश जाधव, समाधान चव्हाण, ताराचंद गायकवाड,

शंकर खेमनर, राधाकिसन घोडसरे, कैलास रोकडे, धनपाल, लक्ष्मीकांत शेंडगे, वन कर्मचारी गोरख मोरे, पोपट ढोकणे, वनपाल सचिन शहाणे, सुनिल अमोलिक यांनी अतीशिताफीने आणि जबाबदारीने काम पार पाडले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts