अहमदनगर बातम्या

अहमदनगर : लूट थांबता थांबेना ! २५ रुपयांच्या सलाईनची ५०० रुपयांना विक्री, बिलातही सावळा गोंधळ

Ahmednagar News : डॉक्टर हे देवाचे रूप असतात असे म्हटले जाते. तशी सेवा देखील अनेक डॉक्टर करतात. परंतु काही रुग्णालयात रुग्णांना मात्र लुटले जाते अशी अवस्था आहे. गरिबांची होणारी भरमसाठ लूट पाहता डोके सुन्न होईल. असेच काही प्रकार संगमनेर मधून समोर आले आहेत.

संगमनेरमधील काही रुग्णालयात रुग्णाला उपचारांसाठी दाखल केल्यानंतर प्रथम त्याला सलाईन देण्यात येते. या सलाईन द्वारेच औषधे दिली जातात. त्यामुळे सर्वप्रथम सलाईन आणावे लागते. या सलाईनची किंमत असते अवघे २५ ते ५० रुपये.

परंतु रुग्णांकडून मात्र ४०० ते ५०० रुपये वसूल केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सलाईन सोबत आयव्ही सेट, इंजेक्शन, सुई आणि इतर साहित्य देखील लागते. त्याच्याही किमती अवाच्या सव्वा आकारल्या जातात. त्यामुळे रुग्णांची लूटमार होत असते.

* रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषध खरेदीची सक्ती

सलाईन किंवा इतर औषधें जे लागतात ते त्याच रुग्णालयाच्या मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती केली जाते असे काही रुग्ण सांगतात. याबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आम्ही लिहून दिलेली

औषधे ठराविक मेडिकलमधूनच घ्यावी असे बंधन घालत नाही. ते कुठूनही औषध खरेदी करू शकतात असे त्यांनी सांगितले. तर रुग्णांच्या नातेवाइकांशी विचारपूस केली असता त्यांनी डॉक्टरांनी आम्हाला येथूनच औषधे घ्यावी लागतील असे सांगितले आहे.

* बिलातही गोंधळ

रुग्णालयात आल्यानंतर दर्शनी भागात दरपत्रक लावलेले असते. परंतु ऍडमिट झाल्यानंतर उपचार पूर्ण होईपर्यंत बिलात बेड चार्जेस, नर्सिग चार्जेस, डॉक्टर व्हिजिट चार्जेस, आरएमओ राउंड चार्जेस, मॉनिटर, बीएमडब्ल्यू चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस, सुपर कन्सल्टंट राउंड चार्जेस, ईसीजी आदी अनेक बिले त्यात समाविष्ठ झालेली असतात. तसेच मेडिकल बिल हे या बिलपेक्षा वेगळे आलेले असते.

* मेडिक्लेम पॉलिसी आहे ना ? जाऊ द्या मग !!

अनेकांनी मेडिक्लेम पॉलिसी काढलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात व मेडिकल या दोन्हीचे बिल कितीही आले तरी रुग्ण चिंता करत नाहीत. तसेच डॉक्टर किंवा मेडिकल वाले हे देखील मेडिक्लेम पॉलिसी आहे ना ? जाऊ द्या मग, पाहू बिलाचं नंतर अशा अविर्भावात असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts