उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली. परिणामी, राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि.१८) राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे.
डिसेंबरच्या मध्यावर राज्यात थंडीची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील अनेक भागांचे तापमान किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे.
येथून राज्याच्या दिशेने वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे सपाटीवरील प्रदेशात किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. विदर्भातील अनेक भागांचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आतमध्ये आहे.
तसेच, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडीत वाढ झाली आहे. राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. त्यामुळे थंडीत आणखी वाढ होणार आहे. सर्वांत जास्त कमाल तापमान अलिबागमध्ये ३४.९ अंश सेल्सिअस इतके होते.
सोमवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे १४.५, अहमदनगर १४.५, कोल्हापूर १९.१, महाबळेश्वर १३.५, नाशिक १४.२, सांगली १८.९, सातारा १८.५, सोलापूर १९.८, मुंबई २४, सांताक्रूझ २३.६, रत्नागिरी २५.६, डहाणू २०.८, धाराशीव १७.६, छत्रपती संभाजीनगर १५.४, परभणी १५.९, नांदेड १७.२, बीड १६.४, अकोला १५.३, अमरावती १४.९, बुलढाणा १४, ब्रह्मपुरी १३.६, चंद्रपूर १३, गोंदिया १२.५, नागपूर १२.८, वर्धा १३.६, वाशीम १२.८, वर्धा १३.६, यवतमाळ १३.