अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- शेवाग्व – पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात असलेल्या पाथर्डी नगरपालिकेमध्ये 120 कोटी रुपयांचे विकास कामे झालेली आहेत.
यातील अनेक कामात गैरप्रकार झाला असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते अॅड.प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तसेच ढाकणे पुढे म्हणाले कि, राजळे या गैरप्रकाराच्या टक्केवारीत स्वतः सहभागी असल्याने त्याही संबंधीत गैप्रकाराला जबाबदार आहेत.
5 वर्षात नगरपालिकेत झालेल्या सर्व विकास कामाचे नगरविकास खात्याने चौकशीचे आदेश दिले असून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत याची संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचे अॅड. ढाकणे यांनी सांगितले.
दरम्यान अॅड. ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहे. यावेळी बोलताना अॅड. ढाकणे म्हणाले, नगरपालिकेच्या कारभाराबाबत 15 मुद्द्यांवर अॅड.हरिहर गर्जे यांनी राज्याच्या नगर विकास खात्याकडे तक्रार केली होती.
त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना नगरपालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या गैरकारभाराच्या चौकशीबाबत लेखी आदेश दिले आहेत. आ. राजळेंच्या नेतृत्वात नगरपालिकेत सत्ता आली होती.
येथील भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी आमदारांनी जबादारी घेतली नाही. विकास कामाच्या निधीत मोठी अफरातफर झाली आहे, म्हणून नगरविकास खात्याने पालिकेच्या कोठ्यावधीच्या विकास कामांची चौकशी लावली आहे.
पालिकेच्या माध्यमातून शहरात झालेली सर्व कामे निकृष्ट आहे. या कारभाराला आ. राजळेच जबादार असल्याचा आरोप ढाकणे यांनी केला आहे.