अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागला आहे. याला आळा बसावा यासाठी पोलीस देखील आक्रमक पाऊले उचलू लागले आहे.
नुकतेच एका तलवार धारी व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव
शिवारात हॉटेल मटन भाकरी येथे असणारा राजेंद्र संभाजी माने याच्याकडे एक लोखंडी तलवार असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत नेवासा पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर रात्री नेवासा ते श्रीरामपूर रोडवर पोलीस पेट्रोलिंग करत असताना हॉटेल मटन भाकरी येथे गेले असता त्या ठिकाणी राजेंद्र माने हा हातात तलवार घेऊन उभा असलेला दिसला.
पोलिसांनी त्यास जागीच पकडून त्याच्या कब्जातील ५०० रुपये किंमतीची पितळी मूठ असलेली तलवार जप्त केली. त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांना परवाना नसल्याचे सांगितले.
याबाबत नेवासा नेवासा पोलीस ठाण्यात पो.कॉ. संदीप म्हातारदेव म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल काढण्यात आला आहे.