अहमदनगर बातम्या

राष्ट्रवादीच्या बैठकीला अनेकांची दांडी; पक्षनिरीक्षक म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  आगामी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी अहमदनगर येथील पक्ष भवनात ठेवली होती.

मात्र या बैठकीला अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दांडी मारली. याबाबतची जाहिर नाराजी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी भाषणातून व्यक्त केली.

10 नगर पालिकेच्या निवडणूक आढावा बैठकीला महिला व युवकांची उपस्थितीती कमी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेथे उपस्थित असलेल्या युवक व महिला अध्यक्षांना त्यांनी याबाबत जाब विचारला.

पालकमंत्री वेळ काढून जिल्ह्यात येतात मात्र नगरपालिकेला उभे राहणारे इच्छुक सुध्दा बैठकीला उपस्थित राहत नसतील तर कसे होणार, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या बैठकीस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आ. संग्राम जगताप, आ. किरण लहामटे, आ. निलेश लंके आदी पदाधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले.

दरम्यान स्व बळावर निवडणूक लढण्याची तयारी असणार्‍या पाथर्डी, राहुरी, शेवगाव नगर पालिकेच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. मात्र, कष्ट करून निवडून आणलेले नगरसेवक पाच वर्ष जपण्याचा सल्ला काकडे यांनी पदाधिकार्‍यांना दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts