अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोविड १९ चा प्रादुर्भाव राज्यात देशात वाढत आहे. नेवासे तालुक्यातील कोविड १९ बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाशी लढण्याबाबत तालुक्यात तहसीलदार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती व उपायोजना सुरु आहेत, परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
वायुनंदन मंडप डेकोरेशन साउंड सिस्टिम व जय हरी बहुउद्देशीय महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माका येथील वायुनंदन लॉन्स माका येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार मुरकुटे बोलत होते.
या कोविड सेंटरचे उद््घाटन सोमवारी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ महाराज म्हणाले, कोरोनाचे संकट महाभयंकर आहे. प्रत्येक देशात प्रादुर्भाव वाढत आहे.
सेंटरचे उद्घाटन करणे ही आनंदाची बाब नसली तरी काळाची गरज आहे. या आरोग्य मंदिरात प्रत्येक रुग्णाला मदत होईल. त्याच्या आरोग्याची काळजी नक्कीच घेतली जाईल. सूत्रसंचालन भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. विजय मुळे यांनी केले.
याप्रसंगी भाऊसाहेब फुलारी, वायुनंदन ग्रुपचे सुभाष आवटी, नवले मामा, विजय पागिरे, रवी काळे, अविनाश वाघमोडे, उपसरपंच सहदेव लोंढे, गोरक्षनाथ घुले, राजेंद्र आव्हाड, राजेंद्र पागिरे, शरद जाधव उपस्थित होते.