अहमदनगर बातम्या

दूध की विष? दूध भेसळीचे दोन नमुने तर आरोग्यास हानिकारक, तुमच्या आरोग्याशी खेळ

अहमदनगर जिल्ह्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर दररोज 32.36 लाख लिटर दूध संकलन होते. परंतु दूध भेसळीचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो. आता काही अहवालाचे रिपोर्ट समोर आले असून काही लोकांनी दुधाच्या माध्यमातून आरोग्याशी खेळ चालवला असल्याचे समोर आले आहे.

दूध भेसळीविरोधात कारवाई करण्यासाठी नगरच्या अन्न औषध प्रशासनाने एप्रिल ते डिसेंबर नऊ महिन्यांच्या कालावधीत दूध भेसळीच्या संशयावरून ७५ नमुने ताब्यात घेतले होते.

ते सर्व अहवाल तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले गेले होते. आता यातील चार नमुन्यांचा अहवाल अन्न -औषध प्रशासनाला प्राप्त झाला असून यातील दोन दुधाचे नमुने मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे.

दूध भेसळीची सद्यस्थिती

७५ पैकी चहर अहवाल आले पण अद्याप ७१ भेसळयुक्त दुधाच्या नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. आलेल्या चार पैकी दोन नमुने तर आरोग्यास हानीकारण सांगितले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला असता १३ लाख ७८ हजार ८०३ दुभत्या गाई व २ लाख ३२ हजार ७०० म्हशी आहेत.

नगर जिल्ह्यात दैनंदिन ३२ लाख ३६ लिटर दुधाचे संकलन होते व १२ लाख ८९ हजार लिटर दूध इतर जिल्ह्यातून नगरमध्ये येते. सर्वाधिक दूध निर्मिती करणाऱ्या नगर जिल्ह्यातच दूध भेसळीचे प्रकार आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

दूध संकलनात अहमदनगर जिल्हा एक नंबर

दूध संकलनाचा विचार केला तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त संकलन होते. जिल्ह्यात दैनंदिन तब्बल ३२ लाख ३६ हजार लिटर दुधाचे संकलन होते. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात २६ लाख २८ हजार लिटर व कोल्हापूर जिल्ह्यात १५ लाख ८२ हजार लिटर दुधाचे संकलन दैनंदिन होते.

नगर जिल्ह्यातील दूध गुजरातसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात जाते. दूध डेअरीमार्फत संकलित झालेले दूध महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह इतर जिल्ह्यात विक्रीसाठी जाते. आता यातच हानिकारक नमुने आढळल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

त्या दोन हानिकारक अहवालाचे काय होणार?

दूध भेसळीवर कारवाई करण्यासाठी अन्न न औषध प्रशासनाने दुधाचे ७५ नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवले. व आता हे चार अहवाल आलेत त्यातील दोन असुरक्षित आढळले आहेत.

दरम्यान आता नमुने आढळलेल्या संबंधितांनी अपील केले असल्याने हे नमुने केंद्र सरकारच्या (एनएबीएल) प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts