अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. त्यामुळे व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळातील पुस्तकात वाचतो आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला,
वाचायला मिळत असते. एवढे असूनसुध्दा नित्य किंवा अधूनमधून व्यायाम करणार्यांची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे उठून आपण फिरायला जातो तेव्हा फिरायला आलेले बरेच लोक आपल्याला दिसतात.
परंतु त्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात विचारात घेतली तर अत्यल्पच असते. त्यामुळे समाजाला वारंवार व्यायामाचे फायदे समजून सांगावे लागतात.
द लैंसेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार जगभरात दर वर्षी 39 लाख लोक अकाली मृत्यूला सामोरे जात आहेत.
ब्रिटेनचे एडिनबर्ग विश्वविद्यालय संशोधक डॉ. पॉल यांनी असे म्हटले आहे की शारीरिक हालचालींचा अभाव, असातोल आहार, मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या जीवनशैली आरोग्यास हानिकारक आहेत.
त्याचा परिणाम आरोग्य बिघडण्यावर होतो. त्यांच्या अभ्यासामध्ये या संशोधन पथकाला असे आढळले की जे शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या टीमने 168 देशांमधील पूर्वी प्रकाशित केलेली आकडेवारी पहिली.
आकडेवारीचे विश्लेषण करताना, त्यांना असे आढळले की जागतिक स्तरावर व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी आहे.
महिलांमध्ये 14 टक्के आणि पुरुषांसाठी 16 टक्के कमी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने आठवड्यातून किमान 150 मिनिट मध्यम-तीव्रतेचा किंवा 75 मिनिटांच्या जोरदार-तीव्रतेच्या व्यायामाची शिफारस केली आहे.
ब्रिटेनच्या केंब्रिज विद्यापीठाचे अभ्यास संशोधक टेसा स्ट्रेन म्हणाल्या की, खेळ असो की जिम असो किंवा जेवण झाल्यानंतरचे जलद चालणे असो यातून हलेल व्यायाम तुमचे आरोग्य वाढवण्यास पर्यायाने आयुष्य वाढवण्यास फायदेशीर ठरते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com