अहमदनगर बातम्या

मंत्री गडाखांच्या प्रयत्नांनी सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- मंत्रिपदाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह सोनई परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे.

एकाचवेळी 14 कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन केले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती ना.शंकरराव गडाख यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने सोनई व परिसरातील सोनई ते मोरयाचिंचोरे (तालुका हद्द) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 9 कोटी 80 लक्ष रुपये,

सोनई- मोरयाचिंचोरे रस्ता ते लोहोगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 2 कोटी 40 लक्ष रुपये, सोनई-शनिशिंगणापूर रस्ता ते खरवंडी चौक रस्ता (हलवाई गल्ली) काँक्रीटीकरण व डांबरीकरण कामासाठी 80 लक्ष रुपये,

सय्यद सॉमिल ते कुसळकर वस्ती रस्ता खडीकरण कामासाठी 14 लक्ष रुपये, सोनई दशक्रियाविधी घाट ते स्वामी विवेकानंद चौक रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी 88 लक्ष रुपये अशा एकूण 14 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन ना. गडाख यांच्या हस्ते झाले.

सोनईसह परिसरात रस्ता कामे मार्गी लागल्याने सोनई, लोहोगाव, मोरयाचिंचोरे, धनगरवाडी परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यवसायिक यांना दळणवळण करणे सुलभ होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts