अहमदनगर बातम्या

शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हात बळकट! मिळाले दलित पॅंथरचे पाठबळ

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही बारा मतदारसंघ आहेत त्यामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा अनेक दृष्टीने महत्वाचा मतदार संघ असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ यावेळेस देखील खूप महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात प्रभावती घोगरे या रिंगणात असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना चारही बाजूने घेरण्याचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.

परंतु जर गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितले तर शिर्डी विधानसभा मतदार संघावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते व त्या ठिकाणी केलेली विकास कामे त्यामुळे या मतदारसंघातील जनता कायमच त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसते.

तसेच या निवडणुकीत अनेक संघटनांकडून आणि समाज घटकांकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठबळ मिळताना दिसून येत असल्यामुळे त्यांचे पारडे सध्या तरी जड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

त्याचाच एक भाग म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅंथरने देखील पाठिंबा दिला असून यामुळे नक्कीच राधाकृष्ण विखे पाटील यांचे या निवडणुकीत हात बळकट होतील हे मात्र निश्चित.

शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅंथरचे पाठबळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅंथरने पाठिंबा दिला असून मतदारसंघातील जनतेला न्याय देणाऱ्या सक्षम नेतृत्वाला विजयी करण्याचे आवाहन दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी केले आहे.

यावेळी दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली व त्यावेळी त्यांनी दलित पॅंथरच्या पाठिंबाचे पत्र त्यांना सुपूर्त केले. तसेच दलित पॅंथरने पाठिंबा दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी देखील त्यांचे आभार मानले. तसेच आता महायुतीच्या प्रचारामध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे अशी विनंती देखील त्यांनी या निमित्ताने केली.

काय म्हटले आहे दलित पॅंथरच्या माध्यमातून दिलेल्या पत्रकात?
दलित पॅंथरच्या माध्यमातून दिलेल्या पत्रकात सुखदेव सोनवणे यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य माणसांकरिता काम करणारे नेतृत्व म्हणून विखे पाटील यांची ओळख आहे व कोणत्याही प्रश्नांमध्ये मार्ग काढून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी काम करणारे सक्षम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

यामुळेच त्यांची नाळ ही सामान्य माणसाची जोडली गेली असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी दलित पॅंथरचे कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे या पत्रकात सोनवणे यांच्या माध्यमातून नमूद करण्यात आले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts