अहमदनगर बातम्या

आमदार लंके यांना सर्दी, खोकला ! ‘या’ रुग्णालयात दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  आमदार लंके यांना सर्दी, खोकला तसेच घशात तडतड होत असल्याने टाकळीढोकेश्‍वर परीसराच्या दौऱ्यावर असताना थेट ग्रामिण रूग्णालय गाठून तेथील डॉ. लोंढे यांच्याकडून त्यांनी उपचार करून घेतले. त्यांच्या या भेटीची तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.

आ. लंके यांचे साधे राहणीमान नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर तिनही पक्षाच्या आमदारांना एका तारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथील तारांकीत सुविधा आ. लंके यांना रूचल्या नाहीत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्याबाबत आपल्या कुचंबनेबाबत तक्रार केली होती.

आमदारांसाठी देण्यात आलेल्या आमदार निवासातही आ. लंके पलंगावर न झोपता सतरंजीवर झोपतात. त्याचे व्हिडीओ यापूर्वीच व्हायरल झालेले आहेत. लंके यांच्या वडीलांच्या हंगे येथील साध्या घराचीही राज्यभर चर्चा झालेली आहे. विधानसभेचा निकाल जाहिर झाला, त्याच दिवशी लंके यांचा किरकोळ अपघात झाला होता.

त्यानंतरही त्यांनी ग्रामिण रूग्णालयात उपचार घेत आमदार झालो तरी मी जमीनीवरच असल्याचे कृतीतून दाखवून दिले होते. नेहमीच सुरू असेलल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे सोमवारी सकाळपासूनच आ. लंके यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. घशातही तडतड होत होती.

मात्र त्यांनी विश्रांती घेण्याचे सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरूवात केली. कार्यक्रमांदरम्यान टाकळीढोकेश्‍वर येथील ग्रामिण रूग्णालयात जाऊन त्यांनी डॉ. लोंढे यांच्याकडून उपचार करून घेतले.

डॉ. लोंढे यांनी आ. लंके यांचा रक्तदाब तसेच इतर चाचण्या करून त्यांना सर्दी खोकल्याची औषधेही दिली. व्यस्त दिनक्रमात वेळेवर औषधे घेण्याचा सल्लाही डॉ. लोंढे यांनी यावेळी त्यांना दिला.

उपचारासाठी गेलेल्या आ.लंके यांनी तेथील रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. लहानग्यांशीही चर्चा करीत त्यांना खाउ देखील दिला. रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. लोंढे यांनी कोरोना काळात अतिशय परीश्रम घेतल्याचे आ. लंके यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts