अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला.
आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे.
स्वखर्चातून उभे राहणारे अशाप्रकारचे हे राज्यातील पहिलेच कोव्हिड सेंटर ठरणार आहे. मार्च महिन्यापासून आ.लंके कोरोना विरोधी लढ्यात राज्यात आघाडीवर आहेत.
कोरोनाच्या जीवघेण्या संकटात लाखो स्थानिक व परप्रांतीय नागरिकांना निवारा, भोजन व प्रवास व्यवस्था आमदार लंके यांच्याकडून करण्यात आली होती.
परराज्यातील खासदार, आमदार तसेच मंत्र्यांकडूनही लंके यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत.
प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता आ. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे.
त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदींनी कौतुक केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved