पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. निलेश लंके यांनी दिली आहे.या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने देवीभोयरे फाटा, पारनेर, सुपा, सारोळा, खडकी रस्त्यासाठी ३६० कोटी रुपये,
पारनेर, बाबुर्डी, विसारपूलासाठी ७ कोटी ५० लाख रुपये, कान्हुर पठार, वेसदरे ते वडझिरे, चिंचोली, सांगवी सुर्या ते जवळा रस्ता, रेनवडी, चोंभूत, वडनेर बुद्रूक ते निघोज मार्गे पिंपरी जलसेन, पानोली, गटेवाडी,
पिंपळगाव रोठा, अक्कल वाडी, पिंपळगाव तुर्क ते कान्हुर पठार, पिंपळगाव रोठा ते गारखिंडी, गोरेगाव ते डिकसळ, लोणी हवेली, हंगा, सुपा, लोणी मावळा ते पाबळ कवडे मळा, शिरापूर ते अळकुटी फाटा,
देवी भोयरे फाटा ते पाडळी दर्या, वडनेर बुद्रूक ते येवले मळा, हत्तल खिंडी ते पुणेवाडी, चिकणे वाडी ते कोरठण, गारखिंडी पोखरकर ते बाभूळवाडे या व इतर रस्त्यांच्या कामांना प्राधान्यांना निधी मंजूर झाला असून,
पारनेर शहर ते सुपा रस्ता चार पदरी होणार आहे. तर देवीभोयरे फाटा ते दौंड, या ४५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ३६० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहितीही आ. लंके यांनी दिली आहे.