Ahmednagar News : आपल्याच गाडीत आपलाच घात करणारी व्यक्ती असते अशा माणसांना आता ओळखावे लागेल, आ. राम शिंदे यांचा वनवास लवकरच संपणार आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ते मंत्री होतील. असा विश्वास खा डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. आ. शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा डॉ सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आ. शिंदे यांचा संघर्षांचा कालावधी संपला आहे. व आम्ही खरे कोण खोटे कोण हे पण ओळखले आहे असे म्हणत पण आता यापुढे तरी मानस पारखून घ्या अशी अपेक्षा व्यक्त केली.