अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात ! गाडी चक्काचूर

MLA Sangram jagtap Car Accident :- आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झालाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ती बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली आमदार संग्राम जगताप अपघातात थोडक्यात बचावले आहेत.

ncp mla sangram jagtap accident on mumbai pune expressway

आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये होते

मात्र सुदैवाने या अपघातात ते बचावलेले आहे.संग्राम जगताप आता मुंबईत पोहोचले असल्याची माहिती मिळत असून ते सुखरूप आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे

रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही घटना आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती.

यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही.

मात्र, कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts