अहमदनगर बातम्या

‘ह्या’ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना ४ मार्च २०२२ पर्यंत दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित, निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दि. २०१९ मध्ये दिलेला कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने राबविल्यामुळे सर्व निवडणुक कार्यक्रम रद केलेल्या राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागाच्या रचना‌ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये नांदूर्खी खुर्द, नांदुर्खी बुद्रुक, राजुरी, डोरहले, साकुरी, खडकेवाके, रांजणखोल, लोहगाव ,आडगाव खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, नपावाडी व निघोज ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सदर प्रारूप प्रभाग रचना तहसील, पंचायत समिती, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. तेव्हा या ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी ४ मार्च २०२२ पर्यंत हरकती नोंदवाव्यात. असे आवाहन ही कुंदन हिरे यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Rahata

Recent Posts