अहमदनगर बातम्या

मोनिका राजळे यांचा प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव हीच त्यांची खरी ताकद- भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून मोनिका राजळे यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत.तसेच मतदारसंघातील गावागावा मधून प्रचार फेरी दरम्यान त्यांना प्रतिसाद देखील उत्तम मिळत असून ही त्यांची जमेची बाजू समजली जात आहे.

याच प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर, चिंचपूर पांगुळ येथे प्रचार फेरी व संवाद बैठका आयोजित केल्या होत्या व त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना धनंजय बडे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की आमदार म्हणून मोनिका राजळे यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम केले असून त्यांचा स्वभावच मुळात मनमिळावू व प्रेमळ आहे. मतदार संघामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात देखील ते कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. हाच स्वभाव त्यांची या निवडणुकीत मोठी ताकद असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे यांनी केले.

काय म्हणाले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे?
शुक्रवारी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ तसेच टाकळीमानुर या ठिकाणी त्याच्या उमेदवार मोनिका राजळे यांची प्रचार फेरी व संवाद बैठक झाली. या बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे हे देखील होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की आमदार म्हणून मोनिका राजळे यांनी मतदारसंघांमध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम केले.

त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळावू असल्याने त्यांचा हाच स्वभाव त्यांची मोठी ताकद असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुंदे,

माजी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवानराव आव्हाड, आजिनाथ पाराजी बडे तसेच भिमराव बडे इत्यादी महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोनिका राजळे काय म्हणाल्या?
यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाले की, दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना प्रत्येकाशी संपर्क जोडला. अगोदर या मतदारसंघाचे नेतृत्व स्व. दगडू पाटील बडे यांनी केले व या भागात आल्यावर त्यांची आठवण येते. स्व. गोपीनाथ मुंडे,

पंकजा मुंडे यांच्यावर मोठा विश्वास या तालुक्यातील लोकांचा असून त्यामुळे त्यांचे देखील प्रेम या भागावर परळी पेक्षा जास्त राहिले आहे. याच प्रेमापोटी पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी मोठा निधी दिल्याने विकासाची कामे मार्गी लागली असे देखील मोनिका राजळे यांनी बोलताना नमूद केले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts