अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर मधील आनंदऋषीजी हॉस्पिटल व विखे पाटील हॉस्पिटल हे असे हॉस्पिटल आहेत तिथे सर्वात स्वस्तात व दर्जेदार उपचार रुग्णांवर होतात.
आनंदऋषीजी हॉस्पिटलचा सामाजिक जाणिवेतून मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम सर्वसामान्य व गोरगरीबांना आधार ठरत आहे. अशा सामाजिक जाणीवेतून शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांची आज समाजाला खरी गरज आहे.
या कामाचा आदर्श घेत युवकांनी समाज कार्यात पुढे यावे, असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी महाराज यांच्या ३० व्या पुण्यस्मृती दिनानिमित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिबीर संयोजक भटेवडा परिवाराचे श्रीमती कुसुम भटेवडा, मनोज भटेवडा आदींसह उद्दोजक डॉ.नितीन कुंकूलोळ, जैन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे दीपक बोथरा, सीए.किरण भंडारी, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.वसंत कटारिया, सतीश लोढा, प्रकाश छल्लानी, डॉ. आशिष भंडारी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ.आशिष भंडारी, नरेंद्र बाफना, स्वाती भटेवडा, अक्षय भटेवडा, आदेश भटेवडा, सेजल भटेवडा, किरण सुराणा, जैन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे संचालक प्रशांत मुथा, सुशील भंडारी, गणेश कांकरिया, सचिन कटारिया आदी उपस्थित होते.