Ahmednagar News : पारनेरमध्ये आईसह मुलाचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर (वय २५, कुंभार गल्ली, पारनेर) यास अटक केलेली होती. पोलीस तपासादरम्यान प्रथमदर्शनी अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात हत्येचा सुनियोजित कट असल्याचे समोर आले आहे.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सूत्रे हलवत आरोपीस ताब्यात घेत तपासाची चक्रे फिरलवली. पोलीस हवालदार संजय लाटे, नाईक गहिनीनाथ यादव, सागर धुमाळ आदींच्या पथकाने आरोपीस अवघ्या चोवीस तासात बेड्या घातल्या.
गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी श्रीमंदिलकर याने शेजारी राहणाऱ्या शीतल येणारे व त्यांच्या अडीच वर्षांच्या स्वराज या मुलाला भरधाव वेगात कार अंगावर घालून चिरडले. त्यात गंभीर जखमी झालेल्या
शीतल यांचा नगर येथील शासकीय रुग्णालयात, तर स्वराजचा विखे पाटील स्रणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या दोघांची हत्या केल्यानंतर चिरडण्यासाठी वापरण्यात आलेली पोलो कार (क्रमांक एमएच १२ आरटी २७७७) शहरातच सोडून आरोपी पळून गेला.
परंतु आरोपीने केली कृत्य व परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले.