अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- नगर शहर व जिल्ह्यातील दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड महिन्यानंतर प्रथमच घटली आहे. सोमवारी १५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दैनंदिन रुग्ण कमी झालेले असतानाच अॅक्टिव्ह रुग्ण देखील कमी झाले आहेत.
जानेवारी महिन्यात दररोज ५०० ते १ हजार रुग्ण आढळून येत होते. नगर जिल्ह्यात सोमवारी ६१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ८० हजार ७९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१९ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ८१५ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११९ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७ आणि अँटीजेन चाचणीत ८ रुग्ण बाधीत आढळले.
डिसेंबर महिन्यात नगर जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमालीची घटली होती.१ डिसेंबरला ३९ तर ३० डिसेंबरला २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. जानेवारी महिन्यानंतर मात्र रुग्ण संख्या वाढू लागली होती.