अहमदनगर बातम्या

नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील – खा.डॉ. सुजय विखे

Ahmednagar News : चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील, हे आज सिद्ध झाले आहे.

सर्व विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून छातीठोकपणे जे पंतप्रधानांबद्दल वाईट बोलत होते त्यांना जनतेच चोख उत्तर दिले आहे. आता तरी त्यांनी मिडियासमोर न येता जनतेत जाऊन झालेल्या चुका सुधाराव्यात,

अन्यथा २०२४ साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन खा.डॉ. सुजय विखे यांनी केले.

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या निर्विवाद बहुमताचा जल्लोष सावेडीत नगर विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. यावेळी खा. सुजय विखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी महेंद्र गंधे, ज्ञानेश्वर काळे, संगीता खरमाळे, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, रेखा विधाते, संतोष गांधी, राजू मंगलारप, गोकुळ काळे, संजय ढोणे, प्रताप परदेशी, मनोज दुल्लम, कुसूम शेलार, अशोक जोशी, संपत नलावडे,

अविनाश साखला, सचिन कुसळकर, नितीन जोशी, सुमित बटोळे, श्रीकांत फंड, ओम काळे, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, बल्लू सचदेव, सतीश शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवून जनतेचा विश्वास भाजपवरच आहे हे सिद्ध केले आहे. या विजयामुळे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल आम्ही जिंकली आहे.

आता २०२४ साली होणारी फायनलही आम्हीच जिंकू व नगरमधून डॉ. सुजय विखे यांना पुन्हा खासदार करू.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts