अहमदनगर बातम्या

निसर्गानेच न्याय केला, यावर्षीही नगर-मराठवाडा संर्घष टळणार

Maharashtra news:नगर-नाशिक आणि मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी समन्यायी कायदा करण्यात आला आहे. त्यावरूनही वाद सुरू आहेत. मात्र, अलीकडे निसर्गानेच हा प्रश्न सोडविण्याचे ठरविल्याचे दिसते.

यावर्षी नगर-नाशिकसह मराठवाड्यातील जायकवाडी धरणही निम्मे भरले आहे. त्यामुळे खाली पाणी सोडण्याची वेळ येणार नाही.समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी साठा झाल्यानंतर वरच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज नसते.

मात्र जर साठा कमी असेल तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडावे लागलेत ऐन उन्हाळ्यात पाणी सोडण्याची वेळ आल्यावर संर्घष निर्माण होतो. असा प्रसंग पूर्वी आले होते. मात्र, आता निसर्गानेच न्याय करायचे ठरविल्याचे दिसते.

त्यामुळे गेल्या काही काळापासून जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा होत आहे. एवढेच नव्हे तर जायकवाड धरण ओव्हरफ्लो झाल्याचीही उदाहरणे आहेत. यावर्षी जुलै महिन्यातच तेथे ५० टक्के पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे पुढील काळात ते धरण भरण्याची शक्यता असल्याने पाणी सोडावे लागणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts