अहमदनगर बातम्या

मंत्री तनपुरेंवरील कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादीने केला ठराव; पक्ष करणार आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.

आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षनिरीक्षक अंकुश काकडे उपस्थित होते.

त्यांनी केंद्र सरकार सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचे सांगत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने केेलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला.

ईडी, सीबीआयचा धाक दाखवून केंद्र सरकार दबाव टाकत असल्याचा आरोप केला. दरम्यान मंत्री तनपुरे यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असून

त्यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या सूचना त्यांनी पक्ष पदाधिकार्‍यांना दिल्या. मंत्री तनपुरे यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असून

त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. मंत्री तनपुरे यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करून त्यांना समर्थन देण्यासाठी बैठकीत हात उंचावून ठराव घेण्यात आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts