अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- भुतकाळात अहमदनगर मध्ये उर्दू साहित्यात काम करणारे भरपूर माणसे होती. ज्यांनी भरपूर उर्दू साहित्यात कार्य केले व त्यांच्या मागे साहित्यात काम करणारी नवी माणसे तयार केली.
त्यामुळे आज ती माणसे साहित्यात काम करत आहे. पण येणार्या नवीन तंत्रज्ञानाच्या काळात उर्दू साहित्यात काम करणारी माणसं फार कमी होत आहे.
त्यासाठी सध्या कार्यरत असणार्या साहित्यकांनी नवीन पिढीला उर्दू साहित्याकडे आकर्षित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उर्दू साहित्यिक व कवी सलीम खान यांनी केले.
मखदूम सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत उर्दू साहित्यकार व कवी कमर कोकणी व प्राध्यापक खलील मुजफ्फर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक कवींचा मुशायरा रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सलीम खान, माजी प्राचार्य कादिर सर, सुफी गायक पवन नाईक, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरूर, रुग्णमित्र नादिर खान, कमरुद्दिन शेख, खालील चौधरी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सलीम खान म्हणाले, कमर कोकणी हे व्यवसायाने टेक्स्टाईल कॉन्ट्रक्टर होते. पण त्यांना उर्दू भाषेची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या साहित्यिक संघटनांच्या माध्यमातून ऊर्दू साहित्यासाठी कार्य केले. त्याचप्रमाणे प्रा.खलील मुजफ्फर यांना तर अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांना उर्दू भाषेची फार आवड होती.
म्हणून त्यांनी मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य उर्दूत भाषांतर केले. त्यांच्या या कार्याचे अनेक साहित्यिकांनी भरभरून कौतुक केले. असे सांगून अनेक मराठी साहित्यकारांच्या पुस्तकांची व नावांची यादीही सादर केली. त्याचप्रमाणे कादिर सर व पवन नाईक यांनीही दिवंगत साहित्यकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी झालेल्या मुशायरा मध्ये बिलाला अहमद, अ.रशिद कुरेशी, शरीफ खान, मुशताक सर,अँड. मन्सूर जहागिरदार, सलीम खान, डाँ. कमर सुरूर, नफिसा हया, आसिफ सर, हबीब पेंटर, मुन्नवर हुसेन यांनी आपल्या रचना सादर केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ही करण्यात आला.
ज्याला शेकडो रसिकांनी त्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर यांनी केले. तर आभार आबीद दुलेखान यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शफकत सय्यद, तारीक शेख, सलीम खान व मगदूम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.