अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- सध्या देशभरात कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक देश आर्थिक संकटात गेले. भारतही त्याला अपवाद नाही. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
तुम्हीही त्यापैकी एक असाल तर काळजी करू नका. तुम्हाला व्यवसायाची संधीही आहे. याद्वारे तुम्हाला बक्कळ पैसे मिळू शकता.
आम्ही तुम्हाला एका व्यवसायाबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करता येणे शक्य आहे.
डेअरी प्रोडक्ट बनवणारी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मदर डेअरी ही त्यांची फ्रँचायझी ऑफर करत आहे. ही फ्रँचायझी घेऊन तुम्ही मोठा व्यवसाय उभा करू शकता.
यामध्ये तुम्हाला 5 ते 10 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनी दूध, दुधापासून बनलेलेल प्रोडक्ट्स आणि अन्य काही खाद्यपदार्थ बनवते आणि विकते.
तसेच कंपनी फळे, भाजी, खाद्यतेल, खाद्यपदार्थ, लोणचे, फळांचे रस, जॅम यांसारख्या वस्तू बनवते किंवा विकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला साधारण 5 ते 10 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.
यामध्ये ब्रँड फीच्या स्वरूपात 50,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. कंपनीकडून यामध्ये कोणतीही रॉयल्टी फी घेतली जात नाही. डेअरी प्रोडक्टच्या व्यवसायामध्ये पहिल्याच दिवसापासून कमाईची सुरुवात होते.
पहिल्याच वर्षी गुंतवणुकीमध्ये 30 टक्के रिटर्न मिळू शकतो. साधारण दर महिन्याला 44,000 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved