देशाला दिशा देणारे नेतृत्व ना. शरद पवार यांच्या रुपाने लाभले -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त वर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन ही वर्चुअल रॅली पार पडली. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक अविनाश घुले, समद खान, बाळासाहेब बारस्कर, प्रकाश भागानगरे, सुनिल त्रिंबके, गणेश भोसले, संपत बारस्कर, संजय चोपडा, अमोल गाडे, राजेश कातोरे, विपुल शेटीया, अभिजीत खोसे, शहर महिला जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे,

अ‍ॅड. शारदा लगड, तालुकाध्यक्ष उध्दवराव दुसुंगे, किसनराव लोटके, अशोक बाबर, संजय सपकाळ, आरिफ शेख, विजय गव्हाळे, विनीत पाऊलबुध्दे, संजय झिंजे, साहेबान जहागीरदार, वैभव ढाकणे, अ‍ॅड. योगेश नेमाणे, गजेंद्र भांडवलकर, दिपक खेडकर, नितीन लिगडे, ऋषीकेश ताठे, रुपेश चोपडा, सिताराम काकडे, बाळासाहेब जगताप, भरत गारुडकर, गणेश बोरुडे, संजय खताडे, निलेश इंगळे, सिध्दार्थ आढाव, दिलदारसिंग बीर, किसनबेद मुथा, लहू कराळे, ज्ञानदेव कापडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई येथून थेट प्रेक्षेपण झालेल्या या कार्यक्रमात ना. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संपुर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध खात्याचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी या वर्चुअल रॅलीच्या माध्यमातून हजेरी लाऊन वाढदिवसानिमित्त ना. पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

ना. पवार यांच्या हस्ते विविध योजना, राष्ट्रवादी काँग्रेसची वेबसाईट व ऑनलाईन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक जिल्हा पातळीवर मुंबईच्या या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व ना. शरद पवार यांनी राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, देशाला दिशा देणारे नेतृत्व ना. शरद पवार यांच्या रुपाने लाभले.

लाखोंच्या संख्येने या रॅलीद्वारे पवार साहेबांना शुभेच्छा देण्यात आले आहे. एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पध्दतीचे त्यांचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे दीपस्तंभ म्हणून संपुर्ण जनता त्यांच्याकडे पाहत असल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन त्यांच्या भावी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ना. पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

12 डिसेंबर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता सण म्हणून साजरा करतो. पक्षाच्या धोरणानुसार सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी आपल्या कर्तुत्वाने ना. शरद पवार यांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. महाराष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीत व देशातील शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी त्यांनी योग्य पध्दतीने कृषी धोरण राबविल्याचे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts