अहमदनगर बातम्या

आता लवकरच जिल्ह्याच्या नामकरणाची अमलबजावणी होणार ..!पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Ahmednagar News : राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामकरणाची घोषणा केली आहे.त्या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच नामकरणाची अंमलबजावणी सुरू होईल.अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील,

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले की,जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर नामकरण राज्य शासनाने घोषित केले आहे. या नामकरणाची कायदेशीर प्रक्रियेनंतर लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असूनप्रचलित पद्धतीनुसारच तलाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या परीक्षेत एकूण साडेदहा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.त्यापैकी जवळपास सव्वा आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली.त्यानंतर प्रश्न आणि उत्तरासंदर्भात शंका निरसन करण्यात आले.आता गुणांकन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.या प्रक्रियेत अनियमितता नाही.

ही प्रक्रिया रद्द केली जाणार नाही.सीना श्वासमुक्तीसाठी लक्ष घातले जाईल.लवकरच या संदर्भात सविस्तर आढावा घेतला जाईल. भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी खासदार ड.सुजय विखे पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे.

या किल्ल्याच्या विकासासाठी संरक्षण मंत्रालयाची मान्यता खासदार सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली आहे.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भुईकोट किल्ल्याच्या विकासाला गती दिली जाईल. यासाठी ९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल असे त्यांनी नमूद केले.

रोजगाराच्या दृष्टीने जिल्ह्यातील आयटी पार्कचा विकास देखील केला जाईल.त्याचसोबत जिल्ह्यात दुधाळ जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकदा आजारी असल्याने त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होते. ते होऊ नये यासाठी जनावरांचा फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे देखील ना. विखे पाटील यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts