Ahmednagar News : शेतकऱ्यांवरील संकटे काही थांबत नाहीत. नुकतीच एका पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करत. शेतकऱ्यांच्या तोंडावर, मानेवर, पायावर, हातावर तसेच अन्य ठिकाणी चावा घेतल्याने दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. भारत भवर व भागवत गरड असे जखमी शेतकऱ्यांची नावे आहेत. यातील एकास नगरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची शेतात कामे सुरू आहेत.
शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील भागवत गरड हे शेतातून काम आटोपून सायंकाळी आपल्या घरी परतत असताना पिसाळलेल्या लांडग्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांच्या तोंडावर, मानेवर व हातावर चावा घेतल्याने ते जखमी झाल्याने त्यांना अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे.
तर सुकळी येथील भारत भवर हे देखिल शेतातून घरी परतत असताना या लांडग्याने त्यांच्यावर हल्ला करून पायाला, हाताला व इतर ठिकाणी चावा घेतल्याने ते जखमी झाले.
भवर यांना बोधेगाव येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या पिसाळलेल्या लांडगायने शेतकऱ्यांच्या तोंडावर, मानेवर, पायावर, हातावर तसेच अन्य ठिकाणी चावा घेतल्याने दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झालेले आहेत.
दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून हिंस्र श्वापदाच्या पायाचे ठसे घेतले असून तो लांडगाच असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.