अहमदनगर बातम्या

अरे देवा: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने तिला दगडाने ठेचून मारले अन….!

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  त्याने एका महिलेस दारू पिण्यासाठी पैसे मागितले ..मात्र त्या महिलेने पैसे न दिल्याने तिचा दगडाने ठेचून खून केला. व नंतर पोलिस पकडतील या भीतीने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात लपून बसलेल्या आरोपीस जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि.२२ जानेवारी रोजी सखुबाई बन्सी शिंदे (रा.हांगेवाडी, ता.केज, जि.बीड) हिला त्याच गावातील राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे याने दारु पिण्यासाठी व गांज्यासाठी पैसे दे असे म्हणुन भांडण केले.

मात्र तीने त्याला पैसे दिले नाहीत त्यामुळे त्याने तिच्या दोरीने गळा आवळून तोंडावर नाकावर व हनुवटीवर मोठ्या दगडाने ठेचून जीवे मारले. अशी फिर्याद दिली होती.

त्यानुसार केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे हा गुन्हा घडल्यापासून पसार झाला होता

तो जामखेड पोलिस स्टेशनच्या परीसरात राहत असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्यानुसार जामखेडच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तो संशयास्पदरित्या वावरताना मिळून आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: jamakhed

Recent Posts