अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- जेवनाचे पार्सल आनण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एकाला भुरट्या चोरट्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. जेवन तयार होवून मिळेपर्यंत
त्याने आपली दुचाकी त्या हॉटेलसमोर लावली मात्र तो जेवन घेवून परत येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी ही मोटारसायकल लंपास केली.
ही घटना पाथर्डी येथे घडली. याबाबत विवेकांनद शेषनारायण राजळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजळे हे येथील तिसगाव शेवगाव रोडवरील हॉटेल शुभम येथे जेवनाचे पार्सल आनण्यासाठी गेले होते.
यावेळी त्यांनी हॉटेलच्या बाहेर मोटारसायकल (एमएच १६ सीएक्स १०३४) लावली होती. जेवनचे पार्सल घेवून राजळे परत आले असता त्यांना त्यांची दुचाकी त्या जागेवर नसल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांनी आपली दुचाकीचा परिसरात शोध घेतला मात्र ती सापडली नाही. म्हणून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार तांबे हे करत आहेत.