अहमदनगर बातम्या

अरे बापरे! चालक लघुशंका करण्यासाठी थांबला अन चोरट्यांनी ट्रक पळवला

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- लघुशंका करण्यासाठी ट्रकचालकाने ट्रक एका रस्त्याच्या कडेला थांबवला व तो लघुशंका करण्यासाठी गेला. मात्र या दरम्यान स्कार्पिओतून आलेल्या तिघांनी सदरचा ट्रकच पळवून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक मुकिंदा पाचपुते हे त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच १६ एई ८१९३) हा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा परिसरातून जात होते.

यावेळी त्यांनी लघुशंका करण्यासाठी सदरचा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला व ते लघुशंका करण्यासाठी गेले. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून (एमएच १२ सीएन १०) आलेल्या

भारत विष्णू धोत्रे (रा.उरळी कांचन ता.हवेली.जि.पुणे), नितीन शिवाजी दरेकर (रा.शिंदेवाडी ता.आष्टी.जि.बीड) व एक अनोळखी इसम आशा तिघांनी सदरचा ट्रक चोरून नेला.

याबाबत ट्रकचालक मुकिंदा पाचपुते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, याबाबत अधिक तपास पोनाग़ोकुळ इंगावले हे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts