Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने यंदाही ‘भव्यदिव्य दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान यंदाचा दसरा महोत्सव चालणार आहे.
यंदाच्या महोत्सवात नागरिकांना केरळ, पंजाब असे राष्ट्रीय तसेच कॅनडा आणि स्पेनमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला नागरिकांना पाहता येणार आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कर्जतमधील विठ्ठल-रुक्मिणी मैदान, शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक ८ येथे ‘विक्रमी उंचीवर भगवा स्वराज्य ध्वज फडकवला जाणार असून,
महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी असे आवाहन आमदार रोहित पवार आणि मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दसरा महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला कार्यक्रम दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पार पडणार असून,
यामध्ये अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार सहभाग घेणार आहेत. यामध्ये ‘लेझर शो’ हे प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच केरळ येथील प्रसिद्ध डान्स ग्रुपचा ‘शबरी चेंडे ‘डान्स’ पाहायला मिळणार आहे.
आकर्षक विद्युत रोषणाईने खर्डा किल्याची सजावट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंजाबमधील ‘वीर खालसा ग्रुप’ ‘गटका’ या पारंपरिक खेळाबरोबर अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके, ‘कोल्हापुरी मर्दानी खेळ’ हा संघ शिवकालीन व युद्धकलेची प्रात्यक्षिके तसेच कॅनडा आणि स्पेन येथील ध्वनीयंत्रणा वाजवली जाणार आहे.