अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील बोटा ते ब्राम्हणवाडा रोडवर घडली आहे.
या अपघातात नाथा लिंबा मेंगाळ वय ६० रा. कुरकुटवाडी ही व्यक्ती ठार झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
शनिवारी नाथा हे किराणा माल आणण्यासाठी बोटा येथे रात्री साडे आठ वाजता गेले असता काळाखडक वस्तीजवळ बोटा ते ब्राम्हणवाडा रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
ही माहिती समजताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे वैद्यकीय डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. याप्रकरणी अंकुश मेंगाळ यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे..