अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्या अनेकदा अनेक गुन्हेगारी घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता अगदी किरकोळ कारणावरून एकास गज काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात
आल्याची घटना जामखेड तालुक्यातील साकत येथे घडली आहे. गोविंद चव्हाण यांना ही मारहाण करण्यात अली असून त्यांच्या फिर्यादीनुसार साकत गावातील दिपक विजय घोडेस्वार, रमेश विजय घोडेस्वार, र
वी बळी घोडेस्वार, दादा मारुती घोडेस्वर ,विकी पुलवळे, कैलास पुलवळे, पप्पू रावसाहेब पुलवळे या सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक माहिती अशी: गोविंद जयसिंग चव्हाण यांनी वायरमनला विजेचा आकडा कट करण्यास सांगितले. याचा राग मनात धरून तालुक्यातील साकत गावातील सात ते आठ जणांनी त्यांना साकत गावातील बसस्थानक परिसरात फोन करून बोलावून घेत गज काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी चव्हाण यांना काळ्या रंगाच्या एमएच 12 सी. के. 5776 या सफारी गाडीत बसवून साकत शिवारातील पवन चक्कीजवळ घेऊन गेले व कोयत्याचा धाक दाखवत तू जर पुन्हा आमच्या नादी लागला
तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी देत मारहाण केली या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश घोडेस्वार व रवी घोडेस्वार या दोन आरोपींना अटक केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved