बोगस डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-सोशल मीडियावर येणारी माहिती शंभर टक्के खरी आहे. असं मानणारा वर्ग आपल्याकडे मोठ्या संख्येने आहे. या माहितीची कोणतीही शहानिशा न करता विश्वास ठेवतात. सध्या कोरोना काळात घरगुती उपाय सांगणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे.

असाच एक कोल्हापुरी बोगस डॉक्टर लोकांच्या भीतीचा फायदा घेत प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध विकत होता. या बोगस डॉक्टरचा संगमनेरमध्ये भांडाफोड झाला आहे. टोनो १६ या नावाने प्रतिकारशक्ती वाढविण्याचे औषध विक्री सुरू केल्याप्रकरणी कथित डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका औषधाच्या दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची जाहिरात सोशल मीडियात केल्याने हा गुन्हा संगमनेर येथे दाखल करण्यात येणार आहे. जीवन संकेत या यू ट्युब चॅनलवर TONO-16 या औषधाची जाहिरात करण्यात आली आहे.

डॉ. स्वागत तोडकर याचे हे औषध गुरूदत्त मेडीकल, घारगाव, ता. संगमनेर येथे उपलब्ध असल्याचे त्यात म्हटले आहे. प्रतिकार शक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. हा प्रकार बेकायदा आहे. त्यामुळे तोडकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचा भंग केल्याचा

तसेच औषध व जादुटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश देण्यात आला आहे.तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही संगमनेर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय कोल्हापूरमध्येही त्यांच्याविरुद्ध कारवाई झालेली आहे.

तोडकर याने व्याख्यानांचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून आपल्या व्यवसायाचा ग्राफ वाढवला. तोडकर स्वत:च्या नावापुढे एम.डी, एनएलपी, एन. डी, मनोविकार तज्ज्ञ, समाजसेवक अशी बिरुदावली लावतो कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही घातक उपचार करणाऱ्या

स्वागत तोडकर व कोमल पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च २०१७ मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस ठाण्यातून सुटका झाल्यावर तोडकरने न्यू महाद्वार रोडवर संजीवनी निसर्ग आधार केंद्र सुरू केले.

यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याची भाषणे ऐकून राज्यभरातील रुग्ण कोल्हापुरात जातात. पुणे, संगमनेर येथे त्याने केंद्रे सुरू केली. तेथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. संगमनेर येथे गुन्हा नोंद होऊनही त्याच्या निसर्ग उपचार केंद्रात गर्दी पहायला मिळते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts