अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- हिंदू धर्माचार्यांची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही. त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून साधुसंतांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या धर्मद्वेष्टे मंडळींनी चालवले असल्याचा
आरोप करत हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी दिला.
गुरुवारी शंकर गायकर यांनी ओझर येथे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्या चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदोरीकर महाराजांना ओळखले जाते.
त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
परंतु महाराजांनी याप्रकरणी माफी मागून खुलासाही केला होता. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनतर त्यांची अनेक राजकीय नेत्यांनी भेटी घेतल्या. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी त्यांची भेट घेतली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com