अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पारनेर तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News : मंगळवारी पारनेर तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर पारनेर तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने जनजीव ठप्प झाले होते तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला आहे.

जानेवारी महिन्यात गहू व ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढणीत आसतात, आशात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी सकाळी सुपा परिसरासह पारनेर तालुक्यातील जातेगाव,

घाणेगाव, पळवे, सुपा, वाघुंडे, बाबुर्डी, म्हसणे, राळेगण सिद्धी, नारायण गव्हाण, परिसरात अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात धुके होते. शेतातील जी पिके पाण्यावर आहेत, त्यांना हा पाऊस फलदायी असला तरी काढणीला आलेल्या पिकांना हा पाऊस हानिकारक आहे.

मंगळवारी सकाळी पावसाला सुरवात झाल्याने शेतीकामे ठप्प झाली. वातावरणात गारठा जाणवत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्याचे दिसत होते. कामगार वर्गाची कामावर जाताना व कामावरुन सुटताना चांगलीच त्रेधातिरपट उडाल्याचे दिसत होते.

जानेवारीत पडणारा हा अवकाळी पाऊस काही शेतमालाला फलदायी आसला तरी काही पिकांना हानिकारक आहे, या पावसानंतर ऊन न पडल्यास भाजीपाला पिके, फुल शेती व नगदी पिकांचे मोठे नुकसान होईल. यात ज्वारी पीक दाणा भरणीत असून,

हा पाऊस दोन दिवस चालला किंवा थोडेफार वादळ आले तरी ज्वारीचे पिक भूईसपाट होण्यास वेळ लागणार नाही. तीच अवस्था गहू हरभऱ्यासह इतर पिकांची आहे. हाच पाऊस लांबला किंवा सुर्यदर्शन झाले नाही तर पिके धोक्यात येतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts