अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जदारांना व जामीनदारांनी त्यांच्याकडे असलेल्या कर्ज रकमांची सव्याज कर्ज येणे बाकी तात्काळ भरावी. अन्यथा बँक थकबाकीदार कर्जदारांवर व जामीनदार यांच्या विरुध्द कर्ज रकमा वसुलीसाठी कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
जाहीर आवाहन करुन देखील आणि प्रतिसाद न दिल्यास अशा सर्व कर्जदारांची व असलेल्या जामीनदारांची नावे ही बँकेच्या वेबसाईटवर प्रसारीत करुन तारण दिलेल्या मालमत्ता प्रत्यक्षात ताब्यात घेवून त्यांची जाहीर लिलावाने विक्री केली जाईल. असे आवाहन नगर बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.
नगर अर्बन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांच्या वतीने बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतीशकुमार रोकडे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात म्हंटले आहे कि, अर्बन बँकेकडे असलेल्या सर्व प्रकारच्या ठेवी सुरक्षित आहेत. बँकेकडे पुरेशी तरलता असून मोठ्या प्रमाणावर कर्ज वसुल करुन उर्वरित निधीची पुर्तता करण्यात येणार आहे.
सर्व ठेवीदारांचे पैसे डीआयसीजीसी व केंद्रीय निबंधक, नवी दिल्ली यांच्या नियमानुसार व आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रीया चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जावू नये.
सर्व ठेवीदारांनी त्यांची के.वाय.सी. बँकेच्या नजीकच्या शाखेत सुपूर्त करावेत. या व्यतिरिक्त बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करणे तसेच आवश्यक ते सर्व उपायांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.