अहमदनगर बातम्या

विकास कामात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- अहमदनगर महानगरपालिकेचे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शहरांमध्ये एकाच वेळी विकास कामे करणे शक्य नाही यासाठी खाजगीकरणातून व लोकसहभागातून उड्डाणपुलाला जोडणारे सहकार सभागृह रस्ता, कोठी रस्ता व इम्पेरियल चौक रस्ता या कामासाठी खाजगीकरण व लोकसहभागातून निधी उपलब्ध केला आहे.

उड्डाण पुलाच्या कामामुळे या जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.यासाठी खाजगी व लोकसहभागातून निधी उपलब्ध केला आहे.

येत्या सोमवारपासून रात्री या कामांना सुरुवात होणार आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाकडूनही विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करीत असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

उड्डाणपुलाला जोडणारे सहकार सभागृह रस्ता, कोठी रस्ता व इम्पेरियल चौक रस्ता खाजगीकरणातून व लोकसहभागातून करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची पाहणी करताना आमदार संग्राम जगताप,जॉय लोखंडे,चेतन भळगट,गजानन शेळके, अभिजीत काळे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts