ग्राहकांचा ATM पासवर्ड चोरून पैसे लुटणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-नगर तालुक्यातील अरणगाव येथे उत्कर्ष पेट्रोल पंप येथील पेट्रोल पंपावर लोकांनी एटीएम वरून पैसे देऊन पेट्रोल भरून लोकांचे एटीएम.

स्वाईप करून लोकांचा एटीएम नंबर विचारून घेऊन ते क्लोन (बनावट एटीएम बनवून) करून अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या एटीएम.

मशीन मधून पैसे काढून घेऊन लोकांची फसवणूक केली. याबाबतचा तक्रार अर्ज कॅम्प पोलीस स्टेशनला दाखल झाले होते.

सदर अर्जाचे चौकशी वरून सायबर पोलीस स्टेशन व कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार यांची संयुक्त टीम तयार करून एटीएम मधून लोकांचे पैसे काढून घेणारी आंतरराज्य टोळीचा तपास सुरु केला.

तपासाअंती या टोळी मधील संशयीत आरोपी नामे सुरज अनिल मिश्रा (वय 23 वर्षे रा. रूम नं 04, ओम शिव शांती, वेलफेअर सोसायटी),

संतोष भवन नालासोपारा (ईस्ट , ता.वसई , जि.पालघर मुळ रा.मळिपुरगाव ता.लमुआ , जि.सुलतानपुर राज्य उत्तर प्रदेश) धिरज अनिल मिश्रा (वय 33 वर्षे रा . रूम नं 506 ,

सी विंग, किनी कॉम्प्लेक्स , नायगाव ईस्ट) यांचा शोध घेऊन त्यांना टोकेवाडी पोलीस स्टेशन जि.ठाणे (ग्रामीण) यांचे मदतीने ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यात रोख रक्कम 2,61,500 रुपये 31 वेगवेगळ्या बँकचे एटीएम, मोबाईल हँन्डसेट असा एकूण 2,79,500 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच वरील आरोपी यांना मदत करणाऱ्या सुजीत राजेंद्र सिंग रा.मुंबई ( फरार ) याचा शोध घेत असून कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts