जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-   जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पुन्हा एकदा नगर तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे.

नगर तालुक्यातील अरणगाव येथील जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकांने छापा टाकला.

यावेळी 25 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व जुगार्‍यांकडून पोलिसांनी 4 लाख 55 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

त्यात 84 हजार 610 रुपयांची रोकड, 3 लाख 70 हजार रुपयांची वाहने, व 550 रुपयांच्या जुगार साहित्याचा समावेश आहे. जेऊरपाठोपाठ नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या

अरणगाव-खंडाळा शिवार हा मोठा जुगार अड्डा म्हणून गेल्या काही दिवसांपासून नावारूपास आला होता. येथे नगर शहरासह आजूबाजूचे जुगारी जुगार खेळण्यासाठी येत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांची धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts