अहमदनगर बातम्या

कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायीची नगर तालुका पोलिसांनी सुटका करून ट्रकसहित 13 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल पकडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात कत्तलीसाठी गाई आल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली.

या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून 1 मोठा ट्रक व 18 गाई ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. सुटका केलेल्या गाईंना गोशाळेत देण्यात आले असून,

ट्रक जप्त करून आरोपींवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहरुख सादिक सयद (रा मालिचिंचोरा नेवासा) व रिजवान नियाज पठाण (रा चांदा नेवासा) यांना अटक केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office