पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचाही गौरव केला – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जगद्गुरु संत तुकारामांच्या नाण्यांचे प्रकाशन करून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनी वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचाही गौरव केला आशा शब्दात भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला.

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लोणी ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील आणि आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी आ.विखे पाटील यांनी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय सामाजिक वाटचालीतील आठवणींना उजाळा देताना पद्मभूषण खा.बाळासाहेब विखे पाटील यांनी जगद्गुरु संत तुकारामांचे नाणे काढण्याचा प्रस्ताव पंतप्रधान वाजपेयी यांच्यासमोर ठेवला

त्याला तात्काळ मंजूरी दिलीच परंतू दिल्लीत नाण्याच्या विमोचन सोहळ्यालाही त्यांची आवर्जून उपस्थिती होती. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हा मोठा सन्मान ठरला.

वाजपेयी यांनी संपूर्ण वाटचालीत देश आणि सामाजिक हिताला प्राधान्य दिले.पोखरण येथील अणू चाचण्यांची यशस्वीता आणि कारगीलचा विजयी केलेला संघर्ष हे त्यांच्या धाडसी निर्णयांचे द्योतक ठरले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

विरोधी पक्षात आणि सतेत असतानाही संसदीय प्रथा आणि परंपराचा नेहमीच आदर त्यांनी केला, त्यामुळे अनेक वर्षे राजकाराणात राहूनही त्यांच्याविषयी सर्वच पक्षांमध्ये आदरभाव होता.

वैचारीक मतभेद असू शकतात पण मनभेदाला त्यांनी कधीही जवळ केले नाही. कवी पत्रकार आणि राजकारणातील संवेदनशील व्यक्तीने विचारांची प्रगल्भता कायम जोपासल्याचे आ.विखे पाटील म्हणाले. याप्रसंगी जेष्‍ठनेते काशिनाथ विखे, एम.वाय विखे, किसनराव विखे,

तंटामुक्‍ती अध्‍यक्ष संपतराव विखे, आण्‍णासाहेब विखे, चांगदेव विखे, रामभाऊ विखे, सिनेट सदस्‍य अनिल विखे, अशोकराव धावणे, लक्ष्‍मण बनसोडे, अनिल विखे, चंद्रकांत म्‍हस्‍के, लक्ष्‍मण विखे, गणेश विखे, रावसाहेब साबळे, रविंद्र धावणे, दगडू म्‍हस्‍के, विजय विखे, संतोष विखे, अनिल विखे, कैलास विखे आदिंसह ग्रामस्‍थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts