अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- पालकमंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जि. प. अध्यक्ष राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप व नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह,
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.
नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये दररोज ३०० चाचण्या केल्या जात आहेत.
ही संख्या प्रतिदिन एक हजार होणार असल्याने बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वेगाने करणे शक्य होईल, असे मुश्रीफ म्हणाले.
जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालये अवाजवी बिल आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेतली असून अशा अवाजवी शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचे ऑडिट केले जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com