Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. परंतु जर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार रोहित पवार हे परत रिंगणात होते तर त्यांच्या समोर महायुतीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी तगडे आवाहन निर्माण केले होते.
झालेल्या मतदानामध्ये या विधानसभा मतदारसंघात सरासरी 75 टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील एकूण तीन लाख 47 हजार 303 मतदारांपैकी दोन लाख 60 हजार 380 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली. कर्जत जामखेड साठी एकूण सरासरी 74.97% मतदान पार पडल
बऱ्याच ठिकाणी मतदारांमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला व अनेक ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. उद्या म्हणजे शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण राज्यात पार पडणार आहे व कर्जत जामखेड मतदार संघासाठी 27 फेरीत मतमोजणी होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत जर बघितले तर दोन्ही नेत्यांनी प्रचारामध्ये एकमेकांवर प्रचंड प्रमाणात आरोप प्रत्यारोप केले.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्यासोबत जे काही स्थानिक नेते होते त्यांनी त्यांना सोडचिट्टी देत राम शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले व त्यामुळे जिल्ह्याची निवडणूक शिंदे आणि पवार अशी न राहता स्थानिक राजकीय पदाधिकारी व सर्वसामान्य मतदार अशा पद्धतीची रंगली.शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून दादा पाटील महाविद्यालयाचे बॅडमिंटन हॉलला एकूण 356 मतदान यंत्रांसाठी 14 टेबलवर 27 फेरीत मतमोजणी पार पडेल व यासोबतच पोस्टल बॅलेट मतदान त्या व्यतिरिक्त 9 टेबलवर होईल.
मतदान यंत्र आणि पोस्टल मतदानासह कर्जत जामखेड विधानसभेसाठी एकूण 23 टेबलवर 27 फेरीत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली आहे. या मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र प्रमुख लढत ही शिंदे आणि पवार यांच्यात होती.
या मतदारसंघात महिलांचे झाले 73 टक्के मतदान
कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये तीन लाख 47 हजार 303 एकूण मतदार होते व त्यापैकी एक लाख 65 हजार 775 महिला मतदार आहेत. यामध्ये 356 मतदान केंद्रांवर दोन लाख साठ हजार 380 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व यामध्ये एक लाख एकवीस हजार 347 महिला मतदारांचा समावेश असून महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी 73.2 इतकी आहे.