अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकारी,
कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक, शासकीय यंत्रणेतील इतर घटक हे सर्वजण देशसेवा म्हणून कोविड योद्धे म्हणून कार्यरत आहेत. यात पारनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील लेकी व सुना जीवाची बाजी लावून मुंबई, पुणे येथे पोलीस यंत्रणेत आपले देशसेवेचे काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने निभावत आहेत.
मुंबईतील ताडदेव पोलीस मुख्यालयात काम करणारी सुप्रिया प्रल्हाद खोमणे ही आपले कर्तव्य पार पाडत आहे. छबु कैलास नरसाळे, वसई, राजश्री विलास उचाळे नायगाव पोलीस मुख्यालयात, रेखा सागर शिनारे,
बंद गार्डन पुणे, सुषमा नवनाथ कदम अंबरनाथ पोलीस मुख्यालय, सुनिता सबाजी नरसाळे, वरळी, शारदा गेणभाऊ शिनारे, मुंबई पोलीस या सर्व कोरोना विरुद्धच्या या लढाईत कुटुंबापासून गेल्या
कित्येक दिवसापासून दूर राहून जीवाची पर्वा न करता काम करत आहे. या रणरागिणींबद्दल येथील नागरिकांमध्ये अभिमान असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews