Ahmednagar News : ज्या अंमली पदार्थास बंदी घातली आहे त्याची चक्क पोस्टाने विक्री केली जात असल्याची घटना सामोर आली आहे. श्रीरामपुर शहरात थेट पोस्टाने हेरॉईन (अंमली पदार्थ) मागवण्यात आल्याची घटना उघडकीस आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून एकास अटक केली. या प्रकाराने श्रीरामपुरात अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना अतिरिक्त संचालक, एन.सी.बी.मुंबई यांच्याकडून कळवण्यात आले होते की पुणे येथून एक पार्सल श्रीरामपूर येथे येणार असून, या पोस्टाने जाणाऱ्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता असून पार्सलचा क्रमांक कळवला होता. यानंतर स्थानिक पोलीस निरीक्षक यांना याबाबतची कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलिसांना त्यांनी ओला यांनी गुन्हे शाखेचे दिनेश आहेर माहिती देऊन व पोलीस पथकाने श्रीरामपूर येथे शहरातील नेवासा रोडवर असलेल्या पोस्टात मास्तर सागर जात पोस्ट आढाव यांची भेट घेवून पोलिसांना मिळालेल्या या पार्सलच्या क्रमांकाची माहिती घेतली.
हे पार्सल विक्रांत राऊत यांना देण्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पार्सल हे महिला पोस्टमन स्वप्ना प्रशांत माळवे या नेऊन देण्यासाठी निघाल्या असता त्यांच्यापाठीमागे कारवाईसाठी पोलीस पथक त्यांच्या मागावरच होते.
त्यानंतर पार्सल ज्यांच्या घरी द्यायचे त्याच्या आजूबाजूला पटेल हायस्कूलच्या ग्राउंडवर पालिसांनी सापळा लावला. त्यानंतर लगेच एक इसम तेथे आला. त्याने माळवे यांच्याकडून पार्सल स्वीकारले सही केली. तेव्हा पार्सल स्वीकारणारा संबंधित व्यक्ती हा आरोपी असल्याची खात्री होताच पोलिसांनी लगेच त्याला पकडले.
पो. नि. दिनेश आहेर यांनी त्याने स्वीकारलेल्या पार्सलची तपासणी केली. तसेच या आरोपीची झडती घेतली. त्याच्याकडील पार्सलवर इंग्रजीत विक्रांत राऊत, रा. पटेल हायस्कूल असे लिहीलेले होते.
तसेच पार्सल पाठवणाऱ्याचे नाव दिपक दास असा पत्ता लिहीलेला होता. पोलिसांनी पाकीट खोलले असता त्याच्यात पोलिसांना अंमली पदार्थ (हेरॉईन) मिळून आले. सुमारे १२ हजार २०० रुपये किंमतीची ही हेरॉईन पावडर पोलिसांनी जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.