अहमदनगर बातम्या

जमीन खरेदीत प्राथमिक शिक्षकास घातला २६ लाखांचा गंडा..!

Ahmednagar News : एका प्राथमिक शिक्षकास जमीन खरेदी करण्याच्या प्रकरणात खरेदीसाठी दाखविलेल्या जमीनी ऐवजी ऐनवेळी दुसरीच जमीन खरेदी करुन देवुन सव्वीस लाख रुपयाची फसवणुक केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे.

याप्रकरणी प्राथमिक शिक्षक प्रशांत नजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिराजी आप्पा पवार ( रा.शिक्षक कॉलनी), नवनाथ रामभाऊ पवार ( रा.नाथनगर, पाथर्डी) या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, प्रशांत नजन यांचे वडील सुभाष रंगनाथ नजन हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे नोकरी करत होते .ते एप्रिल २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. दरम्यान पिराजी पवार याची सुभाष नजन यांच्याशी तोंडओळख होती.

पवार हा नजन यांना म्हटला कि,खंडोबा माळ, पाथर्डी येथे जमीन विक्रीसाठी असुन ती आपण पार्टनर मध्ये दोघे घेऊ. त्यानंतर पिराजी पवार व नवनाथ पवार यांनी संबंधित जमिनीचा व्यवहार ठरला असून इसारापोटी १ लाख रुपये द्या व उर्वरीत २५ लाख रुपये नंतर द्या असे म्हणून १लाख रुपये घेऊन गेले.

त्यानंतर नजन यांनी पवार यांना ठरलेप्रमाणे वेळोवेळी २६ लाख रुपये रोख रक्कम दिली. मात्र पवार याने फसवणूक करुन खंडोबा माळ येथील जमीन खरेदी करुन न देता बालवे वस्तीयेथील जमीन खरेदी करून दिली. घटनेनंतर नजन यांनी पिराजी पवार व नवनाथ पवार यांना तुम्ही आमची फसवणुक केली आहे.

आम्हाला आमचे पैसे परत द्या असे म्हणाले असता आज देतो, नंतर देतो असे करुन आज पर्यंत पैसे दिले नाही. नजन यांनी ते पैसे परत देण्याची वाट पाहीली .परंतु ते आम्ही पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे पवार म्हणाले.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts