अहमदनगर बातम्या

राहुल तू फक्त कामे सुचव..…निधी देण्याची जबाबदारी माझी.

Ahmednagar News :श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांमधील २१ बंधाऱ्यांच्या कामासाठी रक्कम रु. १७.०० कोटी रुपये निधी मृद व जलसंधारण विभागा मार्फत मंजुर करण्यात आल्याची माहिती कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. सा. कारखान्याचे अध्यक्ष मा. आ. श्री. राहुलदादा जगताप पा. यांनी दिली.

यावेळी बोलाताना जगताप म्हणाले तालुक्यातील श्रीगोंदा, पारगाव,  देवदैठण, भिंगाण दु., येवती, खरातवाडी, भानगाव, गव्हाणेवाडी, कोरेगाव, पिंपळगाव पिसा, टाकळी लोणार, हिरडगाव या गावांमधील पदाधिकारी, शेतकरी वेळोवेळी भेटून पिण्याच्या पाण्याची अडचण तसेच शेतीच्या पाण्याच्या अडचणी मांडत असत.

त्यामुळे त्यांच्या सातत्याच्या मागणी संदर्भात आपल्या जिल्ह्याचे असणारे जलसंधारण मंत्री मा. ना.श्री. शंकररावजी गडाख साहेबांकडे वारंवार पाठपुरावा करुन बंधारे मंजुर करुन घेतले.
त्यामध्ये याअगोदर त्यांनी रु. 16.13 कोटी निधी नवीन बंधारे बांधकामासाठी व रु.27.83 कोटी निधी जुने बंधारे दुरुस्तीसाठी दिला.

तसेच पाणी हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि पाणी जर वेळेत मिळाले नाही तर हातातोंडाशी आलेला घास जळून जातो. त्यामुळे पारगाव सु. हिरवेमळा रु.37.37, श्रीगोंदा कचराडेपो रु.120.40, देवदैठण मावलाई डोह रु.67.28, श्रीगोंदा बोरुडेमळा रु. 36.39,

भिंगाण दु. खंडागळे वस्ती रु.86.13, येवती चोरमले वस्ती रु.110.58, खरातवाडी खरातवस्ती रु.44.97, खरातवाडी शेंडगेमळा रु.44.15, श्रीगोंदा संगम रु.154.19, भानगाव जांभूळ नाला रु.47.45,

खरातवाडी इथापेमळा रु.124.80, गव्हाणेवाडी श्रीराममळा रु.89.05, कोरेगाव उत्तरवाट रु.85.63, कोरेगाव स्मशान भुमी रु.42.83, पिंपळगाव पिसा कमळाई रु.133.44, टाकळी लोणार म्हसोबावाडी रु.52.54, टाकळी लोणार मावलाई रु.55.40, भिंगाण दु. जहागिरदार मळा रु.80.66, भिंगाण खा. म्हासाळ मळा रु.80.26,  हिरडगाव इनाम रु.53.17, कोरेगव्हाण गावठाण रु.146.76 असे एकूण रु.16.93 कोटी नव्याने मंजुर केले आहे.    


            यावेळी जि.प. मा. उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी जलसंधारण मंत्री मा. ना.श्री. शंकररावजी गडाख साहेबांना बेलवंडी येथील बंधाऱ्याच्या भुमीपुजनास येण्यासाठी विनंती केली असता त्यास मान. मंत्री महोदयांनी होकार देत येण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशामआण्णा शेलार व श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती शंकरशेठ पाडळे उपस्थित होते.

मा. आ.राहुल जगताप यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. तालुक्यात बंधारे होणे गरजेचे आहे.त्याशिवाय पाणी टिकू शकत नाही ही भूमिका जगताप यांनी मांडली. त्यावर ना. गडाख यांनी राहुल तू फक्त कामे सुचव त्या कामांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल. यापूर्वीही तुझ्या शब्दावर ४३ कोटींचा निधी नवीन बंधारे व दुरुस्तीसाठी दिले आहेत. बेलवंडी येथे मंजूर झालेल्या कामाच्या भूमिपूजनाला मी येणार आहे असे ना.गडाख यांनी स्पष्ट केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts